शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कंटेनरचा ब्रेकफेल, ‘विघ्न’ टळले! एसटीसह चार वाहनांचा चक्काचूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:51 AM

कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने चार वाहनांना ठोस दिली. एसटीसह कंटनेर रस्त्यालगतच्या अर्धवट कामाच्या पुलाच्या खड्ड्यात पडला.

नसरापूर : कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने चार वाहनांना ठोस दिली. एसटीसह कंटनेर रस्त्यालगतच्या अर्धवट कामाच्या पुलाच्या खड्ड्यात पडला. या विचित्र अपघातात २१ जखमी झाले आहेत. यापैकी १ गंभीर जखमी आहे. यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. कुठलीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरचा चालक मात्र पळून गेला आहे. हा विचित्र अपघात रविवारी दुपारी पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीलगत झाला.कारमधील भारती सतीश शिवरकर (वय ६२, पुणे) व दुचाकीवरील किरण तानाजी बटाव (वय २५, रा. मनमाड) हे गंभीर जखमी आहेत. भोर तालुक्यातील ससेवाडी (शिंदेवाडी) येथील महामार्गावर असलेल्या तीव्र उतार व वळणावर असलेल्या अर्धवट पुलाच्या बांधकामात ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने (आर.जे.१९जी.सी ५३८१) पुढे चाललेल्या कारला धडक देत त्याच्या शेजारून पुण्यावरून भोरला जाणाºया एसटीला (एम.एच.१४,बीटी १६८९) रस्त्याच्या कडेला ढकलत शेजारून जाणाºया दुचाकीला धडक दिली. त्यावेळी एसटी बस व कंटेनर रस्त्यालगत अर्धवट बांधकामात जाऊन पडले. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कार, दुचाकी व एसटीतील २० प्रवासी जखमी झाले.जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गेले अनेक दिवस रखडत सुरू असलेली पुणे महामार्गावरची कामे या अपघातांना जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी यावेळी केला. दरम्यान, या अपघातातील जखमींना स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताच्या वेळी या अवजड वाहनांना काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर केला गेला. स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांनी बघ्यांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.मोठी वाहतूककोंडीया वेळी दुपारी झालेल्या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर सायंकाळपर्र्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ससेवाडीपासून सुमारे १० ते १२ किमी अंतरावरील शिवरे या गावापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. इकडे जुन्या कात्रज बोगद्यातही काही काळ वाहतूककोंडी झाली होती.अपघातातील जखमीरवींद्र तानाजी बटाव (वय २२, रा. मनमाड, सध्या रा. नºहे, पुणे), सनी सतीश शिवरकर (वय ३२, रा. रास्ता पेठ, पुणे), सुजाता बनकर (वय ४०, शिवाजीनगर, पुणे), शोभा रमेश सोनवणे (वय ३८, गंजपेठ, पुणे), संदीप शांताराम वैराट (वय ३२, भवानी पेठ, पुणे), जियालाल किशोरीलाल यादव (वय ४२, रा. मार्केट यार्ड, पुणे), शोभादेवी जियालाल यादव (वय ४०, पुणे), उषा ईश्वर वाघ (वय २७, रा. कोथरूड, पुणे), सविता नामदेव दळवी (वय ४४, रा. शिवरे, ता. भोर), वसंत रेणूसे (वय ५०, रा. मेरावणे, ता. वेल्हा, पुणे), अतुल वसंत रेणुसे, निकिता वसंत रेणुसे, सुरेश भगवान साळुंखे (वय ५७, संघर्षनगर,मुंबई ७२), रमाबाई सुरेश साळुंखे (वय ५२) अनुश्री रामदास कदम व रामदास लक्ष्मण कदम.

टॅग्स :Accidentअपघात