भिगवण: पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भिगवण लगतच्या मदनवाडी पुलावरून खाली कोसळला यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात आज शनिवारी (दि,१५) रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडला यामध्ये चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव (वय,३० रा. मुंबई मूळ उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला. यामध्ये कंटेनर ट्र्क ( एमएच. ४३ सीके ६४११) हा सोलापूरच्या दिशेनं जात असताना पुलावरील संरक्षण कठडे तोडून खाली कोसळला. अपघात घडला तेव्हा सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी अपघातस्थळी जावून सर्व्हिस रोडवरील वाहतूक पूर्ववत केली.
मोठा अनर्थ टळला
आज सकाळी ६ च्या सुमारास चालक यादव हे कंटेनर घेऊन सोलापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक पुलावरील संरक्षण कठडे तोडून खाली कोसळला. सर्व्हिस रस्त्यावर सकाळच्या सुमारास कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.