शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

पीएमपी अध्यक्षपदाचे सातत्याने ब्रेकडाऊन; १२ वर्षात १५ अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 7:00 AM

काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली.

ठळक मुद्देमुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पुर्ण करणारे अधिकारी न मिळण्याचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. सध्याच्या अध्यक्ष नयना गुंडे या कार्यकाळ पुर्ण करतील अशी अपेक्षा असतानाच गुरूवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यामुळे डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या रुपाने ‘पीएमपी’ला १२ वर्षातच १६ वे अध्यक्ष मिळणार आहेत. आधी आघाडी नंतर युती आणि आता महाविकास आघाडी सरकारनेही ‘पीएमपी’चे ब्रेकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेची अनुक्रमे पीएमटी व पीसीएमटी ही स्वतंत्र बससेवा एकत्रित करून ‘पीएमपीएमएल’ ही कंपनी २००७ मध्ये स्थापन करण्यात आली. या कंपनीचे प्रमुख म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यात आले. या पदावर राज्य शासनाकडून आएएस दर्जाच्या अधिकाºयांची नियुक्ती केली जाते. सुब्बराव पाटील हे पीएमपीचे पहिले अध्यक्ष ठरले. त्यांना जेमतेम १५ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यानंतर जानेवारी २०११ पर्यंत चार वर्षात पाच अधिकाºयांची नियुक्ती झाली. दि. ३ जानेवारी २०११ मध्ये पदभार स्वीकारलेले आर. एन. जोशी यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. आतापर्यंत पीएमपीला मिळालेल्या १५ अध्यक्षांपैकी केवळ जोशी हेच कार्यकाळ पुर्ण करू शकले. तर १५ पैकी आठ अधिकाºयांकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. जोशी यांच्यासह केवळ सात अधिकाºयांकडे पीएमपीची पुर्णवेळ जबाबदारी होती. डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य काही सक्षम अधिकारी पीएमपीला मिळाले होते. पण काही महिन्यांतच त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला.  काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली. मुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव टाकण्यात आला होता. ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यापासून आर्थिक स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. खिळखिळ्या बस, घटती प्रवासी संख्या, प्रवासी सुविधांचा अभाव या स्थितीत मागील १२ वर्षात फारसा फरक पडलेला नाही. कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक असतो. पण पीएमपीच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. राज्य सरकारकडून दरवेळी पीएमपीला दुर्लक्षित केले आहे. शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित असताना सतत दुजाभाव करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ----------२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक        अधिकारी                                                                        कार्यकाळ१)     सुब्बराव पाटील                                           दि. २६ ऑगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८२)     अश्विनीकुमार                                             दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९३)     नितीन खाडे                                                  दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ ऑगस्ट २००९४)     महेश झगडे (अतिरिक्त पदभार)                  दि. २५ ऑगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९५)     शिरीष कारले (अतिरिक्त पदभार)                दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०६)     दिलीप बंड (अतिरिक्त पदभार)                   दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११७)     आर. एन. जोशी                                          दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ ऑक्टोबर २०१४८)     आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार)        दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४९)     श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार)              दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५१०)    ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार)  दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५११)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)            दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५१२)     अभिषेक कृष्णा                                         दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६१३)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)          दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७१४)     तुकाराम मुंढे                दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८१५)     नयना गुंडे                    दि. १२ फेब्रुवारी २०१८  --------------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे