उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा सन २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीतील आठवडेबाजार व दैनंदिन बाजार शुल्कवसुलीच्या ठेक्याची आज ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या निविदा आज उघडण्यात आल्या. यामध्ये अजित पोपट कांचन यांची सर्वांत जास्त किमतीची म्हणजे एक कोटी ५४ लाख ९० हजार ८०० इतक्या रकमेची प्राप्त झाली आहे. मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.दैनंदिन शेतमाल विक्री बाजार शुल्कवसुली ठेका निविदा गणेश मोहन कांचन यांनी सुमारे ४० लाख ४७ हजार ८५० रुपये किमतीला भरली आहे. ती सर्वांत जास्त रकमेची असल्याने मंजुरीची प्रक्रिया झाली आहे. आठवडेबाजारासाठी सागर फडतरे यांनी ११२९२०६५.००, अमित सतीश कांचन यांनी १३९४१७२०.००, अलंकार कांचन यांनी १२१६४२५०.००, संजय कांचन यांनी १२५१३५८२.००, प्रमोद फडतरे यांनी ११३५२६८१.००, गणेश मोहन कांचन यांनी १०४६१२०२.००, सुनील मोहन कांचन यांनी १३१०४०००.००, अजित गोरख कासुर्डे यांनी १०९१६७२६.०० तर करण धुमाळ यांनी ११८०३७२६.०० इतक्या रकमेच्या निविदा भरल्या होत्या. ग्रामपंचायतीची या कामाबाबतची अंदाजपत्रकीय किंमत आठवडेबाजारसाठी ९० लाख अधिक प्रत्येक वर्षी १० टक्के वाढ इतकी होती, तर दैनंदिन बाजारसाठी ३१ लाख ५० हजार अधिक १० टक्के दर वर्षी वाढ इतकी होती. निविदा भरण्याच्या मुदतीत आठवडेबाजार शुल्कवसुली ठेक्यासाठी एकूण १० जणांनी आॅनलाईन पद्धतीने निविदा सादर केल्या होत्या. तर, दैनंदिन शेतमाल विक्री बाजार शुल्कवसुली ठेक्यासाठी ५ जणांनी निविदा भरल्या होत्या. - के. जी. कोळी, ग्रामविकास अधिकारी
शुल्कवसुलीचा ठेका पोहोचला दीड कोटीवर
By admin | Published: March 30, 2017 12:23 AM