पुणे : न्यायालयाचा आदेश, सरकारचा निर्णय होऊनही कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. महापालिका अधिकारी, कंत्राटी कामगार देणाºया ठेकेदार कंपन्या संगनमताने कामगारांचे आर्थिक शोषण करत असल्याची टीका या वेळी करण्यात आली.कंत्राटी कामगारांसाठीही किमान वेतन कायदा लागू असल्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, सरकारनेही तसाच निर्णय घेतलाआहे. महापालिकेने त्यानुसार २४ फेब्रुवारी २०१५ पासून कंत्राटी कामगारांचे वेतन दर वाढवल्याचे जाहीर केले. मात्र मागील २९ महिन्यांमध्ये एकाही कंत्राटी कामगाराला त्याप्रमाणे वेतन देण्यात आलेले नाही. सातत्याने मागणी करूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे कामगार युनियनचे म्हणणे आहे.जर हा प्रश्न सुटला नाही तर अजून तीव्र निदर्शने करण्यात येतील व मनपा प्रशासनावर योग्य तीकायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भट यांनी या वेळी दिला. अग्निशमन दलापासून महापालिकेच्या सर्व सेवांचे त्वरेने खासगीकरण केले जात आहे, त्यामुळे कामगारांच्या नोकरीवर परिणाम होतील, म्हणून संघटनेचे सुरुवातीपासूनच कंत्राटी कामगार पद्धतीला विरोध केला आहे, असे भट यांनी सांगितले. नागपूर, मुंबई, नाशिक या महापालिकांमध्ये किमान वेतन कायद्यानुसारच वेतन दिले जाते, त्यांचा आदर्श पुणे महापालिकेने घ्यावा, असे आवाहन युनियनचे पदाधिकारी चंद्रकांत गमरे, मधुकर नरसिंगे, प्रकाश चव्हाण, राम अडागळे, वैजनाथ गायकवाड, शोभा बनसोडे, सुमन अष्टुळ, मयूर खरात, अनंत मालप व युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वेतनासाठी कंत्राटी कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:14 AM