शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
2
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
3
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
4
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
5
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
6
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
7
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
8
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
9
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
10
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
11
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
12
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
13
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
14
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
15
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
16
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
17
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
18
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
19
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
20
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल

बेफिकीर ठेकेदारालाच पुन्हा ठेका

By admin | Published: July 08, 2015 2:47 AM

शहरामध्ये घराघरांत जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार

पुणे : शहरामध्ये घराघरांत जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार पुरविण्यासाठी ४२ लाख ५० हजार रुपयांच्या ठेक्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची शिफारस झालेली असतानाही त्याला पुन्हा काम देण्यात आले आहे.शहरात साथीचे रोग पसरू नये म्हणून घरोघर जाऊन अ‍ॅबेट या औषधाची फवारणी केली जाते. साधरणत: जुलै ते आॅक्टोबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदारामार्फत १५० कंत्राटी कामगार घेतले जातात. यंदाच्या २०१५-१६ या वर्षाकरिता दिशा एजन्सी व श्री एंटरप्रायझेस या दोन ठेकेदारांना प्रत्येकी ४२ लाख ५० हजार असे ८५ लाख रुपयांच्या टेंडरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.दिशा एजन्सीच्या ठेकेदाराचे काम व्यवस्थित नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव ३ जून २०१४ रोजी ठेवण्यात आलेला आहे. या ठेकेदाराने कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत किती कामगार कार्यरत आहेत, याची माहितीच ठेकेदाराला नाही. कामगाराने दररोज फवारणी करण्यासाठी दिलेल्या घरांचे टार्गेट पूर्ण केले जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य प्रमुखांकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा शेराही आरोग्य प्रमुखांनी दिला होता. मात्र, यंदा औषध फवारणीसाठी टेंडर मंजूर करताना पुन्हा त्याच ठेकेदारासह दोघांचे टेंडर आरोग्य विभागाने मंजूर केले आहे. (प्रतिनिधी)