शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

महापौरांसमोरच ठेकेदारांचा वाद

By admin | Published: March 12, 2016 1:42 AM

महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेका एकाच विशिष्ट ठेकेदाराला दिला जात असल्याची तक्रार महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे

पुणे : महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेका एकाच विशिष्ट ठेकेदाराला दिला जात असल्याची तक्रार महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे दुसऱ्या ठेकेदाराने केली. दोन ठेकेदारांच्या या वादात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये नाहक जास्तीचा खर्च करून महापालिकेचे नुकसान होत असल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महापौर प्रशांत जगताप यांनी दिले आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी विविध सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली असते. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये युवा महोत्सवासाठी एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली होती. त्याअंतर्गत छोटे कार्यक्रम घेऊन लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविले जाते.सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महोत्सवासाठी काढलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये कमी रकमेचे टेंडर आले असतानाही जास्त रकमेचे टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराला कार्यक्रमाचे काम देण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. यानिमित्ताने महोत्सवासाठी महापालिकेकडून जास्त रकमेची उधळपट्टी केली जात असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी जगताप यांनी हस्तक्षेप करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.