Pune: कंत्राटी पोलीस भरती म्हणजे बेरोजगार तरूणांचा सरकारी विश्वासघात, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

By राजू इनामदार | Published: October 16, 2023 03:47 PM2023-10-16T15:47:24+5:302023-10-16T15:48:51+5:30

सरकारने याचा फेरविचार केला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला....

Contractual police recruitment is government betrayal of unemployed youth, warns Congress agitation | Pune: कंत्राटी पोलीस भरती म्हणजे बेरोजगार तरूणांचा सरकारी विश्वासघात, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Pune: कंत्राटी पोलीस भरती म्हणजे बेरोजगार तरूणांचा सरकारी विश्वासघात, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

पुणे : सगळ्या सरकारी संस्थांचे खासगीकरण करत सुटलेल्या सरकारने आता राज्यातील पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्याचा घाट घातला आहे. प्रदेश युवक काँग्रेस या धोरणाच्या विरोधात आहे. सरकारने याचा फेरविचार केला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे म्हणाले, हे धोरण म्हणजे बेरोजगार तरूणांना सरकार करत असलेला विश्वासघातच आहे. लाखो तरून घाम गाळून पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कायम स्वरूपाची नोकरी मिळेल अशी त्यांची आशा आहे. एकीकडे या पोलीस भरतीच्या परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटते, दुसरीकडे त्याच दिवशी मुंबईत ३ हजार पोलिसांच्या कंत्राटी पद्धतीच्या भरतीची जाहिरात निघते, हा काय प्रकार आहे याचा खुलासा सरकारने राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी करायला हवा.

अन्यथा राज्यव्यापी आंदोलन-

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे? असा सवालही आबनावे यांनी केला. विचारला आहे. कंत्राटी भरती करण्यासाठी सरकारने दिलेले कारण तार्किक नसून, उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ लागेल हे सरकारला आता कळले का? अशी विचारणाही त्यांनी केली. पेपरफुटीची दखल घ्यायची नाही आणि सरकारी भरती टाळून आणि कंत्राटी पद्धत आणायची हे चुकीचे धोरण युवक काँग्रेस कदापिही खपवून घेणार नाही. सरकारने या धोरणाचा त्वरीत फेरविचार करावा, यापुर्वीच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पारदर्शी स्वरूपाची भरती करावी, त्यांना कायम सेवेत घ्यावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आबनावे यांनी यांनी दिली.

Web Title: Contractual police recruitment is government betrayal of unemployed youth, warns Congress agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.