पुणे : जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालये, दाेन ट्राॅमा केअर आणि आणि एक उपजिल्हा रुग्णालय अशा सात ठिकाणी विविध संवर्गांतील ११३ पदांची कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासाठी नाशिक येथील ‘महाराष्ट्र विकास ग्रुप’ या खासगी कंपनीला कंत्राट दिले. एक वर्षाचा करार तत्त्वावर या सर्व नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यावरून आराेग्य विभागालाही आता कंत्राटीकरणाचे वारे लागल्याचे दिसून येते.
स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, कनिष्ठ लेखनिक, बाह्यरुग्ण लेखनिक, शस्त्रक्रिया विभाग कामगार, ब्लड बँक सहायक, अपघात विभाग सहायक, ब्लड बँक तंत्रज्ञ, डायटिशिअन, ईसीजी तंत्रज्ञ, शिपाई, वॉर्डबॉय आणि सफाई कामगार अशी विविध संवर्गांची पदे याअंतर्गत भरण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश पुणे परिमंडळचे उपसंचालक राधाकिशन पवार यांनी जारी केले आहेत.
काेठे, किती पदे भरणार?
१) ग्रामीण रुग्णालय पाबळ (शिरूर) : एकूण १७ पदे (स्टाफ नर्स ४, एक्स-रे तंत्रज्ञ १, लॅब तंत्रज्ञ १, लॅब सहायक १, कनिष्ठ लेखनिक १, चालक १, शिपाई १, वॉर्डबॉय ४, सफाई कामगार १)
२) मलठण ग्रामीण रुग्णालय (शिरूर) : एकूण १६ पदे (स्टाफ नर्स ४, एक्स-रे तंत्रज्ञ १, लॅब तंत्रज्ञ १, लॅब सहायक १, कनिष्ठ लेखनिक १, चालक १, शिपाई १, वॉर्डबॉय ४, सफाई कामगार २)
३) बाबडा ग्रामीण रुग्णालय (इंदापूर) : एकूण १५ पदे (स्टाफ नर्स ४, एक्स-रे तंत्रज्ञ १, लॅब तंत्रज्ञ १, लॅब सहायक १, कनिष्ठ लेखनिक १, शिपाई १, वॉर्डबॉय ४, सफाई कामगार २)
४) ग्रामीण रुग्णालय भिगवण (इंदापूर) : एकूण १५ पदे (स्टाफ नर्स ४, एक्स-रे तंत्रज्ञ १, लॅब तंत्रज्ञ १, लॅब सहायक १, कनिष्ठ लेखनिक १, शिपाई १, वॉर्डबॉय ४, सफाई कामगार २)
५) उपजिल्हा रुग्णालय इंदापूर : एकूण ३७ पदे (स्टाफ नर्स १५, एक्स रे तंत्रज्ञ १, लॅब तंत्रज्ञ १, लॅब सहायक २, कनिष्ठ लेखनिक १, बाह्यरुग्ण लेखनिक १, शस्त्रक्रिया विभाग कामगार १, ब्लड बँक सहायक १, अपघात विभाग सहायक ३, ब्लड बँक तंत्रज्ञ २, डायटिशन १, ईसीजी तंत्रज्ञ १, शिपाई १, वॉर्ड बॉय ५, सफाई कामगार १)
६) भिगवण ट्रामा केअर युनिट (इंदापूर) :- ७ पदे (स्टाफ नर्स १, चालक १, वॉर्ड बॉय ३, सफाई कामगार २).
७) यवत ट्रामा केअर युनिट (दौंड) :- ७ पदे (स्टाफ नर्स १, चालक १, वॉर्ड बॉय ३, सफाई कामगार २)