लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाला, असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत. तर भिगवणमधील मतदारांनी मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाला कंटाळून विश्रांती घेण्याचा निकाल दिला असल्याने त्यांनी आतातरी विकासाच्या कामात हस्तक्षेप टाळावा, असे सरपंच तानाजी वायसे मत व्यक्त केले.
भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्रे काढल्याचे मागील सताधारी यांचे म्हणणे आहे. तर राजशिष्टाचार नुसार लावलेले छायाचित्र हटविणे हे सताधारी पक्षाचे व्यक्ती आणि पक्षद्वेषी भूमिका असल्यामुचे म्हणणे मांडीत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचातीवर मोर्चा नेत छायाचित्र पूर्ववत लावण्याची मागणी केली. या नाट्यामुळे दोन दिवस वातावरण गरम आहे. तर निवडणूक आचारसंहिता काळात हे छायाचित्र काढले असल्याचे आणि राजशिष्टाचारानुसार योग्य ते छायाचित्रे लावले जाणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील सत्ताबदलाच्या वेळी त्यावेळी असणाऱ्या छायाचित्रांचे काय झाले होते याचे हे आत्मपरीक्षण करावे असे बोलले जात आहे.
याबाबत सरपंच तानाजी वायसे आणि पराग जाधव म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता येत नसल्यामुळे अशी नौटंकी केली जात आहे. मागील सत्ताबदलावेळी विरोधकांनी ग्रामपंचायत कार्यालयात असणारे तत्कालीन छायाचित्रांचे काय करण्यात आले होते याचा विचार केल्यास याचे उत्तर मिळेल असे मत व्यक्त केले. तर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सांगितले. तर विरोधकांनी विकासकामांत काही सूचना मांडल्यास त्या नक्की स्वीकारू. गेल्या ५ वर्षांत झालेले सुडाचे राजकारण केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
नवनिर्वाचित पदाधिकारी गावाच्या विकासासाठी समर्थ असून विरोधकांना मतदारांनी विश्रांतीसाठी निकाल दिला असल्यामुळे मतदारांच्या मताचा आदर ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे. यामुळे हे छायाचित्रे बदलाचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगत आहे. याचा भिगवणच्या विकासावर परिणाम होवू नये, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.