पुणे : मॅन्युअली प्रक्रिया सोयीस्कर
पुणे शहरात सुमारे ५६ हजार आरोग्यसेवकांनी लसीकरणासाठी नावनोंदणी केली आहे़ या सर्वांना संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अॅप’द्वारे लसीकरणासाठीची वेळ दिली जाते़ मात्र हीच वेळ त्या आरोग्यसेवकाच्या कामाच्या सोयीनुसार, कोरोनामुक्त होऊन विहीत कालावधी पूर्ण झाल्याचे पाहून दिली गेल्यास दिवसाला प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस दिली जाऊ शकते़ यामुळे शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्प्यात वेळेत आरोग्यसेवकांना लसीकरण होऊ शकते़ याकरिता या प्रणालीबरोबरच मॅन्युअली प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष आरोग्य सेवकाशी बोलून त्याची वेळ घेणे व लसीकरणासाठी बोलविल्यास लसीकरण लवकरात लवकर होऊ शकते, असे लसीकरणाची प्रक्रिया राबविणा-या यंत्रणचे म्हणणे आहे़
--------------------------
लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रात वाढ होणार
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रारंभी शासन आदेशानुसार शहरात १६ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती़ पण आजमितीला ही संख्या २५ वर नेण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे़ गुरुवार, दि.४ फेब्रुवारी शहरात १ हजार ७८६ जणांना लस देण्यात आली असून, ही टक्केवारी ८९़३ टक्के इतकी आहे़