पुणे : ग्रामीण भागातील पीएमपीला मिळणारे उत्पन्न आणि प्रवासी सेवा पुरवण्यासाठी लागणारा खर्च यामध्ये मोठी तफावत होत असल्याने पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागातील २३ मार्ग बंद करण्यात आले होते. तसेच एसटी महामंडळाने देखील पुणे महानगर परिवहन मंडळाला पत्र लिहून आम्हाला या मार्गांवर तोटा होत असून, या मार्गावरील पीएमपी बस सेवा बंद करण्याचे सांगितले होते. यानुसार पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी २६ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी २३ ग्रामीण भागातील मार्ग बंद केले. यानंतर ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने बंद केलेली पीएमपी सेवा पुन्हा सुरू करा अशी मागणी वाढत होती. त्यातच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ग्रामीण भागातील पीएमपी सेवा पुन्हा सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगितले. याची प्रशासानाने दखल घेत ७ डिसेंबर पासून पुन्हा २३ मार्गांवरील सेवा सुरू केली.
पूर्ववत झालेले पीएमपी मार्ग..
१) २३१ - स्वारगेट - काशिंगगाव२) २३२ - स्वारगेट - बेलावडे३) २९३ - कात्रज सर्पोद्यान - सासवड४) २९६ - कात्रज सर्पोद्यान - विंझर५) २११ - सासवड - उरूळी कांचन६) २१२ - हडपसर - मोरगाव७) २१० - हडपसर - जेजुरी८) २२७ अ बीआरटी - मार्केट यार्ड - खारावडे/लव्हार्डे९) १३७ बीआरटी - वाघोली - राहुगाव, सालु मालू१०) ३५३ - चाकण, आंबेठाण चौक - शिक्रापुर फाटा११) २२० - सासवड - यवत१२) ७४ - हिंजवडी शिवाजी चौक - घोटावडे फाटा१३) ८६ - पुणे स्टेशन - पौंड एसटी स्टँड१४) १०६ - एनडीए गेट नं. १० - सिम्बायोसिस नर्सिंग सुसगाग१५) १३५ बीआरटी - वाघोली - रांजणगाव सांडस१६) १५७ - भेकराईनगर - तळेगाव ढमढेरे१७) १५९ ब बीआरटी - शिक्रापुर एसटी स्टँड - लोणी धामणी१८) १६४ बीआरटी - शिक्रापुर एसटी स्टँड - न्हावरे१९) १८४ - हडपसर - लोणी काळभोर रामदरा२०) २२८ - कात्रज - वडगाव मावळ२१) २६४ - भोसरी - पाबळगाव२२) ३१६ - चिंचवडगाव - खांबोली (कातरखडक)२३) ३६८ - निगडी - लोणावळा रेल्वे स्टेशन