को-विन अॅपचा वापर करून मेसेज पाठविणे, संबंधिताची संगणकीय प्रणालीत नोंद करणे़ यापेक्षा मतदान प्रक्रियेप्रमाणे येणाऱ्या व्यक्तींची लेखी नोंदणी करून, संबंधिताला कोरोना प्रतिबंधक लस देणे सहज शक्य आहे़ ही प्रक्रिया अवलंबली असती तर आत्तापर्यंत शहरातील लसीकरणाचा दहा लाखांपर्यंतचा टप्पा सहज पार झाला असता़ परंतु, आजपर्यंत केवळ ५४ हजार ९६३ जणांना लस देता आली आहे़
पुणे महापालिकेची लस साठवणूक क्षमता आठ लाख लस डोसपेक्षा अधिक आहे़ तर महापालिकेकडे १५ जानेवारीपासूनच १ लाख ९७ हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस आलेले आहेत़ मात्र किचकट अशा संगणकीय प्रक्रियेमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे़ त्यामुळे ही प्रक्रिया प्रत्यक्ष लेखी प्रक्रियेव्दारे केल्यास लसीकरणाचा टक्का वाढेल, अशी मागणी आता सर्वच स्तरांतून होत आहे़
-----------------------------------