नारायणगाव पोलीस ठाण्याच्या सभागृह आज (दि. २१) नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील सर्व व्यापारी, दुकानमालक, हॉटेलमालक, मंगल कार्यालयमालक, पोलीस पाटील यांची कोविड - १९ चे अनुषंगाने बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड, सरपंच राजेश मेहेर, जनरल मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष किशोर पोखरणा, व्यापारी प्रतिनिधी अशोक गांधी, श्रीराम पतसंस्थचे अध्यक्ष तानाजी डेरे, संजय वारुळे, जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे, शिरीष जठार, कांतीभाई पटेल, रमेश गुगळे, राजेंद्र पाटे, शेखर शेटे ,नवीन भुजबळ,प्रवीण पवार ,मंगेश डेरे ,प्रदीप चिखले,अभिषेक भुजबळ ,पोलीस पाटील सुशांत भुजबळ,मनोज दर्डा ,सतीश दळवी ,सचिन जुंदरे ,योगेश जुन्नरकर ,राहुल पापळ, गिरीश रसाळ ,महेंद्र खेबडे ,सलीम मोमीन ,बाबू वारुळे, गिरीश मुनोत ,आनंद गुगळे ,परीसरातील सर्व व्यापारी, दुकानमालक, हॉटेलमालक, मंगल कार्यालय मालक,पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी मंदार जवळे म्हणाले की, परिसरात घराबाहेर फिरताना मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर करा, विनाकारण बाहेर फिरू नका, गर्दी करू नका, लग्नकार्यात ५० जणांना परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येईल. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा जवळे यांनी या वेळी दिला आहे.
सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी केले.