राहू : सहकारी संस्था या शेतकऱ्यांचा आत्मा असल्याने सहकारी चळवळ टिकविण्याची गरज असल्याचे मत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संस्थापक-कार्याध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी व्यक्त केले.वाळकी (ता. दौंड) येथील वाळकी सहकारी सोसायटीच्या २० लाख रुपये खर्चून होत असलेल्या इमारतीचे भूमिपूजन दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी राऊत बोलत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी सोसायट्यांकडून सभासदांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळत आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. स्वत:ची आर्थिक प्रगती साधताना मुलांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.या वेळी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, की राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. या प्रसंगी राजाभाऊ तांबे म्हणाले, की शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापुढे दौंड तालुक्यात शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे तांबे म्हणाले.या वेळी बाळासाहेब थोरात, माऊली शिंदे, सुरेश साठे, मोहन चोरमले, राजेंद्र जोंधळे, काका तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरपंच विमल चोरमले, संजय थोरात, बन्सीलाल फडतरे, नारायण जगताप, सुभाष कुदळे, नाना जेधे, शहाजी थोरात, संजय थोरात, सुदाम कोंडे, स्वाती साळुंके, बाळासाहेब थोरात, दिलीप हाके, विक्रम मलगुंडे, दिगांबर थोरात, प्रकाश मते, नागेश थोरात रवींद्र होले, बापू बिडगर, शिवहरी फडतरे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
‘सहकारी संस्था शेतकऱ्यांचा आत्मा’
By admin | Published: January 05, 2016 2:29 AM