शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

समन्वयाभावी रखडला रस्ता

By admin | Published: October 03, 2015 1:22 AM

गेल्या दोन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून

अतुल क्षीरसागर, रावेतगेल्या दोन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहापदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे औंधमार्गे येणारा बीआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला मधला मार्ग असून, या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचते. पण, या रस्त्याचे काम असे अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्याचे काम जवळपास पाच वर्षांपासून सुरू होऊन नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले आहे. तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे अजूनही हा रस्ता वापरात नाही. या रस्त्याचा पूर्ण खर्च महापालिका करणार होती. पण, त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून, प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि पूल बांधून पूर्ण झाले असून, महापालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. या रस्त्याच्या कामाचा ठेका ठेकेदार अजवाडी यांना देण्यात आला होता. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे, असेही जाहीर करण्यात आले आहे. प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे.आता महापालिकेच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे. हा महापालिकेच्या हद्दीतील रस्ता राहिल्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाकामार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. तेथील भूसंपादन महापालिकेच्या वतीने करता येईल. मात्र, पुढील काम प्राधिकरणाला पूर्ण करावे लागेल, असे महापालिका नगररचना विभागाचे म्हणणे आहे.रस्ता प्रशस्त झाला, परंतु वाहतुकीस खुला नसल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला गर्दुल्यांचा अड्डा या ठिकाणी भरत असल्यामुळे रात्री १-२पर्यंत गर्दुल्यांचा गोंधळ या ठिकाणी चालू असतो. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या विविध सोसायट्यांतील नागरिकांना व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.