भिगवण : भिगवण येथील कला महाविद्यालयात परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्याचा प्रयत्न करणा-या शिक्षकाला विद्यार्थ्याकडून अंगावर धावून जात शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. शाळा प्रशासन या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होत आहे. विद्यार्थिनी भीतीच्या सावटाखाली परीक्षा देत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे रोडरोमिओगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात कला विषयाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार वाढत असल्यामुळे शिक्षकांनी कॉपी होऊ नये. यासाठी तपासणी मोहीम राबवली असताना याबाबत काही विद्यार्थ्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न करणाºया शिक्षकाला दमबाजी करण्याचाही प्रयत्न केला. तर शिक्षक विद्यार्थ्याची कॉपी तपासत असताना विद्यार्थ्याने शिक्षकाला अंगावर धावून जात माझ्या अंगाला हात लावला तर बघून घेईन, अशी दमबाजी करीत शिवीगाळ केली.या वेळी शिक्षकाने याची तक्रार प्राचार्यांकडे केली. या सर्व प्रकारामुळे शाळेतील मुलींनी या प्रकरणाची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. प्राचार्यांनी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नसल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. मात्र असे असले तरी भिगवण शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची दादागिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अगदी नववीत शिकणाºया विद्यार्थ्यांनी वर्गशक्षकाच्या श्रीमुखात भडकाविण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल होत नसल्यामुळे पोलीसही कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.काही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केल्यास अनेक राजकीय पुढाºयांचे फोन पोलीस ठाण्यात सुरु होत असल्यामुळे पोलीसही कारवाईत आस्ते कदम प्रक्रिया राबवीत असल्याचे दिसून येत आहे. शाळा परिसराततुफान मारामारीचे प्रकार घडूनही आपापसात तडजोडी करीत मिटविण्याचे प्रकारही घडत असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या मनोबलात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.शाळेत असा प्रकारघडला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.- भास्कर गटगुळ, प्राचार्य
कॉपीबहाद्दराकडून शिक्षकाला धमकी, विद्यार्थ्यांची बदलतेय मानसिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:10 AM