शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

खेड तालुक्यात कोरोनाबधित महिलेने केला खासगी वाहनाने प्रवास, माहिती मिळताच प्रशासनाकडून क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 PM

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने संबंधित महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

ठळक मुद्देखेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील घटना,

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे ५ दिवसापूर्वी एकाच दिवशी ४ जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एका महिला डिस्चार्ज रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यावर खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता गुरुवारी (दि. २१)रात्री ९ वाजता खासगी वाहनाने राक्षेवाडी येथे तिच्या घरी आली होती. मात्र, प्रशासनाला या घटनेची माहिती समजताच तात्काळ त्या महिलेला पुन्हा पुण्यातील एका रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी (ता. खेड) येथील व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यानंतर या कुटुंबातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात बाधित व्यक्तीची पत्नी,शेजारी राहत असलेला बहिणीचा पती , बहिणीचा मुलगा(भाचा) आणि सासु यांचा समावेश आहे. यामुळे या कुटुंबात एकुण पाच जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले होते.पती व महिला यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयाने या महिलेला २१ मे च्या रात्री खासगी वाहनाने खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता आणण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती. मात्र पुन्हा प्रशासनाने संबधित रुग्णालयाशी संर्पक केला होता. पहाटे ३ वाजता त्या महिलेला पुन्हा त्याच  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या महिलेच्या पतीला याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तो दिवसाआड पुण्यात जाऊन येऊन करीत होता. त्याचा थेट संपर्क आला म्हणुन कुटुंबातील पत्नी, मेहुणा ,त्याची पत्नी,सासु,सासरा व भाचा आणि त्याची दोन लहान मुले यांसह बाधित व्यक्तीवर उपचार करणारे परिसरातील डॉक्टर, नर्स,इतर एक असे ११ जण 'हाय रिस्क' म्हणुन तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल आले होते. त्यातील डॉक्टर, नर्स, दोन मुले इतर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कुटुंबातील चार जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची तब्येत ठणठणीत असली तरी त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. राक्षेवाडी हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच कन्टेंमेन्ट झोन म्हणून प्रशासनाने जाहिर केला आहे.मात्र, पाच दिवसात महिलेला डिस्चार्ज कसा काय मिळाला याबाबत ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असुन पुन्हा भीतीदायक वातावरण परिसरात सुरू झाले असल्याचे राक्षेवाडीचे पोलिस पाटील पप्पू काका राक्षे यांनी सांगितले.

............................................................

या महिलेच्या पतीच्या रिपोर्ट तारखेला पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पत्नीला दि १५ मे रोजी तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांचा हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिथे स्टाफ नसल्याने तसेच या कोरोनाग्रस्त महिलेची लक्षणे कमी झाल्यामुळे खेड प्रशासनाला कुठलीही माहिती न देता त्या महिलेला पुण्यातुन राक्षेवाडीत खासगी वाहनाने पाठविले होते.डॉ.बळीराम गाढवे, तालुका वैदयकीय अधिकारी, खेड )

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला