शाळेतील शिक्षकांनी कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी विशेष असे पत्रक तयार केले असून मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवणे, तसेच हात स्वच्छ धुणे या संदेशाबरोबरच पालकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी लसीकरण लस ही सुरक्षित आहे. ‘आम्ही घेतली आहे तुम्ही पण घ्या’ असे संदेश देणारे पत्रक तयार केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक महादेव पवार, पदवीधर शिक्षक कैलास वणवे, राजेंद्र बोरावके, मारुती दराडे, रवींद्र शेलार, अनिल शिंदे, संतोष ननवरे आदी शिक्षक अकोले, वायसेवाडी, धायगुडेवाडी येथील घरोघरी जाऊन तोंडी माहिती देऊन महत्त्व सांगून कोरोनाविषयी जनजागृती प्रभावीपणे करत आहेत.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात तालुक्यात आघाडीवर असणा-या शाळेने सामाजिक बांधिलकी जोपासत या कार्यातही झोकून दिले आहे.
त्यांच्या या कार्याचे व योगदानाचे विशेष कौतुक व अभिनंदन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, राजकुमार बामणे केंदप्रमुख बोरावके व डॉ. चांदगुडे, ग्रामसेवक सचिन पवार यांनी केले आहे.
१७ अकोले
वायसेवाडी शाळेच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान करताना शिक्षक कर्मचारी.