शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

बारामतीत कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:10 AM

पहिल्या दिवशी २०० आरोग्य कर्मचाºयांना लसीकरण बारामती :अखेर बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरणाला बारामतीमध्ये प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाच्या माध्यामातून मागील ...

पहिल्या दिवशी २००

आरोग्य कर्मचाºयांना लसीकरण

बारामती :अखेर बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरणाला बारामतीमध्ये प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाच्या माध्यामातून मागील दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीसोबत निर्णायक युद्धाला आता सुरूवात झाली आहे. बारामती महिला रुग्णालय येथे लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी म्हणून अभिजित पवार यांना लस देऊन सुरुवात करण्यात आली. लसीकरणानंतर एकाही लाभार्थ्याला कोणाताही त्रास झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बारामती तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे, तर शहरमध्ये महिला शासकीय रुग्णालयात पहिल्या टप्प्यातील लसीकरणास शनिवारी (दि. १६) सुरुवात करण्यात आली. बारामतीमध्ये सकाळी ११ वाजता कोविड लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी एका सत्रामध्ये १०० याप्रमाणे आज एकूण २०० लोकांना लस देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांची निवड ही जिल्ह्यातून रॅन्डम पद्धतीने होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना एसएमएस आलेला आहे अशाच लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. बारामतीसाठी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीचे शनिवारी (दि. १६) २६० डोस मिळाले आहेत. तर उर्वरित सर्व डोस रविवार (दि. १७)पर्यंत मिळतील. आता पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

तालुक्यातील १ हजार २७८ शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ््यांनी कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणा करण्यात येणार आहे. सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचा-यांना गुलाबपुष्प देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे कक्ष अधिकारी हनुमंत पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी डॉ. केदारे, वैद्यकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय, डॉ. जाधवर, प्रशासकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय नंदकुमार कोकरे, डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ.जर्नादन सुरटे, डॉ.मेघा, डॉ.दडस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सदानंद काळे यांनी लस देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच लस तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचा-यांना प्रथम लस देण्यात येईल. दुस-या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचारी, तिस-या टप्प्यात कोमोबीर्ड रुग्ण व ६० वर्षांवरील व्यक्तीस देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, पहिल्या सत्रात शंभर लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम जरी सुरू झाली असली, तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.

सांगवी (ता. बारामती) येथे कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारीवर्ग व आरोग्य कर्मचारी.

१६०१२०२१-बारामती-०१

फोटो ओळी : शासकीय महिला रुग्णालय बारामती येथे लाभार्थी आरोग्य कर्मचाºयास लस देताना व्हॅक्सीनेटर

१६०१२०२१-बारामती-०२

-------------------------------