चाकण : वाढत्या कोरोनाच्या प्रकोपामुळे चाकण तरकारी बाजारात खरेदीदार येत नसल्याने भाजीपाला शेतीमाल विक्रीअभावी पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. कांदा, बटाटा मार्केट यार्डमध्ये आवक कमी होऊनही व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने कांदा मातीमोल भावाने विक्री होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवलही वसूल होत नाही.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही बाजारभाव स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले.भुईमूग शेंगांची आवक घटूनही भाव घसरले.लसूणाची आवक व भाव स्थिर राहिले.
कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका, वाटाणा व गाजर या फळभाज्यांची आवक घटून बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची आवक व भावातही घट झाली.जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय यांच्या संख्येत वाढ झाली तर म्हैस व शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत घट झाली.एकूण उलाढाल ३ कोटी ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १,००० क्विंटलने घटूनही कांद्याचे भाव स्थिर राहिले.कांद्याचा बाजारभाव १,३०० रुपयांवर स्थिरावले.
तळेगाव बटाट्याची एकूण ५५० आवक क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत ही आवक ४५० क्विंटलने कमी होऊनही बाजारभाव १,६०० स्थिर राहिले. लसणाची एकूण आवक १६ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुनलेत ही आवक स्थिर राहिल्याने बाजारभाव ६,००० रुपयांवर स्थिरावले.भुईमुग शेंगांची ६ क्विंटलची आवक झाल्याने भाव ६,५०० आले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २३० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा - एकूण आवक - ३,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,०५० रुपये, भाव क्रमांक ३. ९०० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ५५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
फळभाज्या -
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोमॅटो - ६४ पेट्या ( ५०० ते १,००० रू. ), कोबी - १४२ पोती ( ४०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - १३३ पोती ( ५०० ते ७०० रु.),वांगी - ६२ पोती ( ६०० ते १,२०० रु.), भेंडी - ५३ पोती ( २,००० ते ३,००० रु.),दोडका - ४७ पोती ( २,००० ते ३,००० रु.), कारली - ५३ डाग ( २,५०० ते ३,५०० रु.), दुधीभोपळा - ३३ पोती ( १,००० ते १,५०० रु.),काकडी - ३९ पोती ( १,००० ते १,५०० रु.), फरशी - २४ पोती ( २,५०० ते ३,५०० रु.), वालवड - २७ पोती ( २,००० ते ४,००० रु.), गवार - २३ पोती ( ४,००० ते ६,००० रू.), ढोबळी मिरची - ५६ डाग ( १,००० ते २,००० रु.), चवळी - २० पोती ( २,०००) ते ३,००० रुपये ), वाटाणा - १०५ पोती ( ५,००० ते ६,००० रुपये ), शेवगा - १५ पोती ( १,००० ते २,००० रुपये ), गाजर - १३० पोती ( १,००० ते १,५०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ९० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १०१ ते ६०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ९५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते ५०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची ७०० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ६०० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
मेथी - एकूण १८ हजार ५९० जुड्या ( ५०० ते १,००० रुपये ), कोथिंबीर - एकूण २७ हजार ९५० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), शेपू - एकुण ३ हजार ५३० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ४ हजार २२० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे -
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १२० जर्शी गायींपैकी ८० गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), १८० बैलांपैकी १४५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रुपये ), १७० म्हशींपैकी १२० म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १०,९०० शेळ्या - मेंढ्यापैकी १०,७५० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना २,००० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
२९ चाकण
चाकण बाजारात संतोष खैरे यांच्या गाळ्यावर दोडक्याची मोठी आवक झाली.