पुणे : निवडणूक आयोगाने पंढरपुरात निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो. कोरोना रुग्णवाढीला नागरिकच जबाबदार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने पंढरपुरात निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो, राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या. पण पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू इथंही निवडणूक लावली. त्यामुळे तिकडे जाऊन सगळेजण प्रचार करतच होते ना... कुंभमेळ्यात लाखो लोकांनी स्नान केले होते. याला जबाबदार नागरिक आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक लावली त्यांना जबाबदार कसं धरणार... जी काही नियमावली ठरवली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून सभा आयोजित करावी असं आम्ही सांगतो. परंतु काही जण मास्क लावत नव्हते, रुमाल लावायचे त्यांना आम्ही काय बोलणार?