पुणे: शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रकृतीला कुठलाही धोका नसलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या नियोजनात थोडाफार बदल करावा. अशी मागणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
गंभीर आजार नसलेल्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये रुग्णालय संलग्न हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी. रुबी हॉलने कपिला हॉटेल ताब्यात घेतले आहे. रुग्ण त्यांना परवडणाऱ्या ठिकाणी राहू शकतात. तसेच रुग्णांवर खर्चाचा ताणही येणार नाही. गेल्यावेळी मी या सूचना दिल्या होत्या. पण रुबी हॉल सोडून कुठेही अशी व्यवस्था होऊ शकली नाही. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे महानगरपालिका यांनी सहकार्य करून मोठ्या रुग्णालयांना हॉटेलशी जोडून द्यावे. बऱ्याच जणांची उत्तम सोय होईल अशी विनंतीही त्यांनी केली.
महिला आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी मिळावेत १०० कोटी
पुणे जिल्ह्यातुन कुठले प्रकल्प घेतले जाणार आहेत. त्या प्रकल्पाची माहिती व सर्व समाजाचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिला विकास आणि सामाजिक न्यायाच्या काम करणारा काही अन्य संस्थांना व सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवण्यासाठी बैठक घेण्यात यावी. त्या बैठकीमध्ये मलाही उपस्थित राहण्यासाठी आपण जरूर व्यवस्था करावी. त्याचसोबत लोकांची नावे सुचवत त्यांनाही निमंत्रित करावे. त्या बैठकीला आपण स्वतः असलात तर अधिक चांगलें होईलच. अन्यथा आपणचं जे अधिकारी निर्देशित कराल ते आम्ही मिळून चर्चा करू. असेही त्यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.