बारामती : बारामती शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या सातव्या रुग्णाची पाळेमुळे शोधण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे .त्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवले आहे. शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो. त्या रुग्णाचा मुलगा औषधविक्रेत्याकडे कामाला आहे. मागील आठवड्यात समर्थनगर येथील भाजीविक्रेत्यासह कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाले होते.यामध्ये ९ एप्रिलला त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील इतरांवर पुण्यात उपचार सुरू आहेत . त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे . त्यामुळे बारामतीकराना दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा आणखी एक रुग्ण सापडल्याने बारामतीकर धास्तावले आहेत .हा रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहेशहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. काल सापडलेल्या सातव्या कोरोना रुग्णाच्या घरातील १६ रुग्णांना पुण्याला कोरोनाची चाचणी करण्यासाठी नेले आहे.यामध्ये कोरोना रुग्णाच्या घरातील ३ मुले,३ सुना, मुलाचे सासू, सासरे,पत्नी व ७ नातवंडे यांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कोणाला भेटले. त्याची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कुटुंबातील लोकांना प्रथमच कोरोना चाचणी करण्यासाठी नेले आहे .त्यामुळे बारामतीमध्ये धास्तीचे वातावरण आहे.दरम्यान,बारामतीमध्ये सध्या अफवांच्या पूर आला आहे.व नागरिकांच्या कोरोना रुग्णांना घेऊन वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.प्रशासनाने अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
बारामतीतील ‘त्या’ सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना तपासणीसाठी पाठवले; अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 2:26 PM
रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहे.
ठळक मुद्देएवढ्या मोठ्या संख्येने एकाच कुटुंबातील लोकांना प्रथमच कोरोना चाचणी करण्यासाठी नेले आहे