इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरात प्रथम टप्प्यातील सुपर स्प्रेडर असणारे भाजी विक्रेते, शेतकरी व व्यापारी व नागरिक यांच्यापासून तपासणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अंकिता शहा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले की, इंदापूर शहर तसेच तालुक्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण सुपर स्प्रेडर यांची कोविड तपासणी करीत आहोत. इंदापूर शहर हे तालुक्याचे केंद्रस्थान आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होवू नये म्हणून येणाऱ्या काळात मोठ्या स्तरावर या तपासण्या करण्यात येणार आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी कापरे यांनी केले आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयातच उपचार
इंदापूर भाजी मंडईत भाजीविक्रेते व नागरिक यांची कोरोना तपासणी केली आहे. त्यांचा अहवाल शासनाच्या वतीने शुक्रवारी प्राप्त होईल. सर्वांना मोबाइलवर संदेश येईल. मात्र ज्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांनी घाबरून न जाता जवळच्या शासकीय अथवा शक्य असल्यास खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. शासनाचे नियम तंतोतंत पाळावेत, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.
१० इंदापूर तपासणी
इंदापूरच्या भाजीमंडईत भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांचा स्वॅब घेताना घेताना आरोग्य कर्मचारी.