पुणे : कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात महापालिका हद्दीतील १५ लाख नागरिकांना लस देण्याचे उदिष्ठ आहे़ वय वर्षे ४५ वरील सर्वांना लस देण्यास आज सुरूवात करण्यात आली असून, या चौथ्या टप्प्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान मोहोळ यांनी आज मेड इन पुणे असलेल्या कोविशील्ड लसीचा डोस घेतला असून, यानंतर त्यांनी कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले़
कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात महापौर मोहोळ यांना प्रथम लस देऊन पुणे महानगरपालिकेच्या सुतार दवाखान्यात करण्यात आली. लसीकरणानंतर बोलताना मोहोळ यांनी, कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तर वेगाने आणि व्यापक लसीकरण आणि तपासण्या वाढवण्याकडे महापालिकेचा कल असल्याचे सांगितले़ आताच्या कालावधीत कोरोना लस ही ''संजीवनी''प्रमाणे असून, पात्र असलेल्या नागरकांनी वेळ न दवदडता लस घ्यावी असे आवाहनही केले़
-------------------------
चौकट
कोरोना लसीकरणात दिव्यांगांना मिळणार प्राधान्य
कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु झाल्यानंतर आता लसीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप येत असून, या लसीकरण मोहिमेत दिव्यांग मात्र पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्य द्यावे़ अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ आरोग्य विभागाला दिल्या आहेत़
---------------------------
फोटो मेल केला आहे़
-------------------