पिंपरी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियम व निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा प्रकारे विनामास्क फिरणा-या ३३६ नागरिकांवर पिंपरी-चिंचवडपोलिसांनी रविवारी कारवाई केली.
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
काल दिवसभरात शहरात ३ हजार ३८२ रुग्ण आढळले असून १ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ६३६ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ९२८ वर गेली आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या २ हजार ०६५ वर पोहोचली आहे.
शहरात विनामास्क फिरणा-या ३३६ नागरिकांवर रविवारी एमआयडीसी भोसरी (४७), भोसरी (३१), पिंपरी (६), चिंचवड (४५), निगडी (२८), आळंदी (२६), चाकण (००), दिघी (२९), सांगवी (७), वाकड (२६), हिंजवडी (३३), देहूरोड (४), तळेगाव दाभाडे (३), तळेगाव एमआयडीसी (१३), चिखली (२०), रावेत पोलीस चौकी (८), शिरगाव पोलीस चौकी (००), म्हाळुंगे पोलीस चौकी (००) या पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली.