शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 6:25 PM

सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

पुणे : शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, नववर्षाच्या सुरुवातीला होणारी ही वाढ शहराच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६ हजार ७८६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यापैकी ७.७२ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोजच्या मोठया रुग्ण वाढीमुळे, रविवारी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या अडीच हजारांवर गेली आहे. गेल्या रविवारी ( दि.२६) ९८१ इतकीच होती. आठ दिवसात यामध्ये दीड हजारने वाढ झाली आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५१४ इतकी आहे. सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण पुण्याबाहेरील आहे.      आतापर्यंत ३८ लाख ७९ हजार ४८७ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ५ लाख ११ हजार १४१ जण बाधित आढळून आले आहेत. यातील ४ लाख ९९ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ११८ जण दगावले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लस