----
भरत निगडे : नीरामध्ये घबरटा वाढली, रुग्णांच३ी संख्य वाढली
---
अवघ्या जगाला हादरुन सोडलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराने आज नीरेत पुन्हा एक बळी घेतला. पण हा म्रुत्यु रुग्णाच्या निष्काळजीपणा मुळेच झाला असल्याची चर्चा नीरा शहरात कुजबूजली जात आहे. कोरोन पाँझिटिव्ह रिपोर्टर आल्यानंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी वेगवेगळी कारणे देत रुग्णाला घरी होम आशुलेशन करतो असे सांगितले, पण काल गुरवारी रुग्णाला ह्रुदय विकाराचा तिव्र झटका आल्याने पाँझिटिव्ह रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच म्रुत्यु झाला.
त्याचे झाले असे सोमवार ३० नोव्हेंबर रोजी नीरा येथील वार्ड नं १ मधिल ६८ वर्षीय व्यक्ती थोडे आजारी असल्याने त्यांना फँमिली डॉक्टरांनी कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला. या रुग्णाच्या मुलाने त्यांच्यासोबत जाऊन जेजुरीच्या कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना तपासणी करुण घेतली, अहवाल पाँझिटिव्ह आल्यावर रुग्णांचे वय जास्त आहे, शारिरीक व्याधी आहेत, उठया बसताना त्रास होतो, मी स्वतः फार्मासीट आहे अशी कारणे मुलाने देत त्यांच्यावर आम्ही होम आशुलेशन द्वारे उपचार घेतो असा आग्रह धरला. जेजुरी कोरोना सेंटरच्या व्यवस्थापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोन सेंटरमध्येच रुग्णाला उपचार करुद्या असा सल्ला दिला, मात्र फार्मासिस्ट असलेल्या रुग्णाच्या मुलाने आग्रह केल्याने अधिकाऱ्यांनी औषधे दिली व कोरोना संदर्भात काय काळजी घ्याची ते सांगितले. गुरवार दि. रोजी ३ फार्मासिस्ट अषलेल्या ३१ वर्षीय मुलाचा रिपोर्टर पाँझिटिव्ह आला. दोघेही होम आशुलेशन करत घरीच होते. सुस्थितीत असलेले ६८ वर्षीय वडिलांचा छातीत दुखु लागल्यने उपचारापूर्वीच म्रुत्यु झाला.
काल गुरवारी मुलाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्यानंतर ही ६८ वर्षीय वडिलांनी दिवसभर घरगुती साफसफाई, व अतिश्रमाची कामे केली असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी पवनेसहा वाजता ते अंगणात पाणी मारुन झाडलोट करताना शेजाऱ्यांना दिसले होते. त्यानंतर त्यांना छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना लोणंदच्या नामांकीत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा म्रुत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णालया बाहेरूनच त्यांच्या नातेवाईकांना पिटाळले. नातेवाईकांनी रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह असल्याचे सांगितले तरी रुग्णाचा म्रुतदेह कोणतीही संसर्गाची काळजी न घेता तसाच ताब्यात दिला. म्रतदेह घेऊन नातेवाईक नीरा येथील निवासस्थानी आले. आता अंत्यविधी करण्याचा मोठ प्रश्न निर्माण झाला. नातेवाईक व भावकीने सपशेल पाठफिरवली.
कोरोना रुग्णाचा म्रुत्यु झाल्याची वार्ता नीरा शहरात वाऱ्यासारखी पसरली. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्या सहाय्यक व आरोग्यसेवक तातकाळ घटनास्थळी धावले. कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी नातेवाईकांना सांगितली. पि.पी.टी. किट उपलब्ध करुन दिले. सामाजिक कार्यकर्त्यांनी जेजुरी नगरपालीकेला व मार्तंड देवसंस्थानच्या माजी प्रमुख विश्वस्थांना या बबत कल्पना दिली. काही कार्यकर्त्यांनी अणखीन पाच पि.पी.टी. किट नातेवाईकांना उपलब्ध करुण दिले. अंत्यविधी कोणी करायचा हा मोठा पेच समोर होताच. अखेर रात्री साडेअकरा वाजता जेजुरी नगरपालीकेचे कर्मचारी शववाहीनी घेऊन आले व साडेबाराच्या सुमारास जेजुरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
--
चौकट
नातेवाईकांचा कळस.
म्रुत्यू सायंकळी साडेसहाच्या दरम्यान झाल्यानंतर म्रुतदेह लोणंद येथून नीरा येथील राहत्या घरी आणल्यावर जवळच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत बेफिकरीने म्रुतदेहाला आलिंगण देत तोंडावरुन हात फिरवत शोक व्यक्त केला. यादरम्यान म्रतदेहाचे तोंड व नाक उघडेच होते. लहान मुले, महिलांनी अक्षरशा म्रुतदेहा शेजारी गराडा घातला. ही धोक्याची घंटा ओळखून सामाजिक कार्यकर्त्यांनी म्रतदेहाच्य नाकात व तोंडात कापूस ठेवण्याचा आग्रह धरला. नातेवाईकांना या व्यक्तीला कोरोना झाल्याची पुरेपूर कल्पना असतान ही त्यांनी दाखवलेला हलगर्जीपणा हा एक प्रकारचा कळसच जाणवला.
--
रुग्ण संख्या वाढली
नीरा शहरात १ डिसेंबर पर्यंत २७१ रुग्ण पाँझिटिव्ह रुग्ण होते. १० रुग्णांचे म्रुत्यू झाला आहे, त्या आज एकने भर पडली. २५१ रुग्ण कोरोनावर मत करत घरी परतले, तर आजही १५ ते १६ रुग्ण विविध कोरोना सेंटर, रुग्णालयात व होम आयशुलेशन द्वारे घरीच उपचार घेत आहेत. नीरेतील बरेच रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची तितकीसी नोंद शासकीय पातळीवर ठेवली जात नाही. मात्र अशा रुग्णांचे नातीवाईक व हायरिस्क कँटेक्ट मधिल व्यक्ती कोरोना तपासणी करण्याचे टाळत आहे. तसेच ते बिनदिक्कतपणे शहरात वारतात व आपले व्यावसाय सुरु ठेवत आहेत. व्यावसायिक व काही युवक सर्रास विनामास्क नीरा शहरात आपले व्यावसाय व कमधंदा करत असतात जसे कोरोना गेलाच आहे.