शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोना प्रतिबंधात्मक औषध : बारामतीच्या डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 3:58 PM

बारामतीच्या डॉक्टरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

बारामती : बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोनाबाधित रूग्णांवर देखील उपचार होऊ शकतात. तसेच कोरोनामुळे शरीरावर होणारे दुरगामी परिणाम देखील टाळता येऊ शकतात. हळदीमध्ये आढळणारा ' करक्युमीन '  हा पोषक घटक व काळी मिरी यांचे मिश्रणातून हे औषध बनविण्यात आले आहे.  बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद  व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. 

याबाबत डॉ. कीर्ती पवार म्हणाल्या, बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च  यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल १४० रुग्णांवर  घेण्यात आली. यात सौम्य लक्षणे , मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता. रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून कोरोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका समुहाला कोविड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधे देण्यात आली तर दुसऱ्या  समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन ५२५ एमजी  व बायोपेरीन अडीच एमजी  (म्हणजे हळद व काळी मिरी याचे योग्य मिश्रण असलेले ) हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आले.

या निरीक्षणांमधून खालील मिळालेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे

- करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये- ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले,- हे औषध घेणा-या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले.- हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी ७ ते २७ दिवस होता तर करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांचा ५ ते  १० दिवस होता. - करक्युमीन  घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली. - तसेच कृत्रिम श्वसनाचे मशीन लावण्याची गरजही कमी झाली. - रुग्णालयात दाखल होताना मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज कमी लागली.- मध्यम  व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.- रक्त पातळ करणाºया हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम  होत नाही हे सिध्द झाले. - या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता  प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोविडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परीणाम,  ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व शरीरातील रक्तवाहिन्यांमध्यें होणाºया गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.

कोरोना होऊन गेल्यावरही पुढील ३ महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोरोनामुळे होणारे दुरगामी परिणाम टाळण्यासाठी मदत होऊ शकते याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनाद्वारे मांडण्यात आला. डॉ.किर्ती पवार,  डॉ. राहूल मस्तूद , डॉ सतीश पवार, सम्राज्ञी पवार,  डॉ. रमेश भोईटे , डॉ. राहुल भोईटे,  डॉ. मीनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे यांच्या चमूने केलेले हे संशोधन औषधशास्त्रातील विख्यात आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये प्रसिद्ध झाले आहे.  यामुळे भारतातीलच नाही जगभरातील कोरोना रुग्णांमधील उपचारासाठी मदत होणार आहे. या संशोधनामुळे शासकीय व वैद्यकीययंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत मिळेल. करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी यु.एस.एफ.डी.ए मान्यताप्राप्त आहे व ती कोणत्याही औषधाच्या दुकानात उपलब्ध आहे व कोविड होऊ नये म्हणून रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसmedicineऔषधं