शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 5:45 PM

सद्य स्थितीत शहरात ९५ मेजर कंटेन्मेंट झोेन आहेत, तर ३७० मायक्रो कंटेन्मेंट झोेन आहेत.

ठळक मुद्देशहरातील ७० टक्के रुग्ण गृहविलगीकरणातउपचार घेत असलेल्या २५ रुग्णांचा सात दिवसात मृत्यू रोज सरासरी २५०० तपासण्या रुग्ण वाढ लक्षात घेता महापालिकने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू सध्या शहराचा पॉझिटिव्ही रेट हा १७ टक्के

पिंपरी : शहरात फेब्रुवारीपासून सुरू झालेली कोरोना रुग्णांची वाढ ही सुरूच आहे. शहरात २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या सात दिवसांत २,९२१ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात उपचार घेत असलेल्या २५ रुग्णांचा या सात दिवसात मृत्यू झाला आहे. परंतु, आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेली आहे, असे महापलिका वैद्यकीय विभागाने सांगितले.

सध्या शहरात ४२६३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२४१ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर ३०२२ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहराचा सध्या पॉझिटिव्हीटी रेट हा १७ असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने माहिपालिकने रोजच्या तपासणीत वाढ केली आहे. शहरात रोज सरासरी २५०० तपासण्या केल्या जात आहेत.

नोव्हेंबरनंतर शहरात रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे कोरोना आता संपला असे वाटत असताना पुन्हा अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीत शहरात ३६९७ रुग्ण आढळून आले होते, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीत ५४१२ रुग्णांची नोंद झाली आणि ४७ रुग्णांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी रुग्ण संख्या वाढत असली, तरी मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र, ४ आणि ५ फेब्रुवारीला शहरात प्रत्येकी ४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत शहरात ९५ मेजर कंटेन्मेंट झोेन आहेत, तर ३७० मायक्रो कंटेन्मेंट झोेन आहेत.

रुग्ण वाढ लक्षात घेता महापालिकने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच ठेवण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे, एका रुग्ण आढळल्यास १२ ते १६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.---

वायसीएम लॅब २४ तास उपलब्धरुग्ण संख्या वाढल्याने तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व चाचण्यांचे अहवाल तपासण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या लॅबमध्ये पाठविले जातात. अहवालाची प्रतिक्षा कमी व्हावी आणि लवकर अहवाल मिळावा म्हणून वायसीएमची लॅब २४ कार्यान्वित करण्यात आली आहे.

---सध्या शहराचा पॉझिटिव्ही रेट हा १७ टक्के आहे. रोज होणाऱ्या चाचण्यांवरून पॉझिटिव्ही रेट कमी जास्त होत असतो. सद्यस्थितीत पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. नियमांचे उल्लघन होणार नाही, या करीता उपाय योजना केल्या जात आहे.

- राजेश पाटील, आयुक्त महापालिका--रुग्ण संख्येत वाढ होत, असती तरी आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सर्वाधिक आहेत. गंभीर लक्षणे असलेले रुग्ण कमी आहेत. सध्या शहराचा १७ टक्के पॉझिटिव्ही रेट आहे.- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका--

सात दिवसात झालेल्या तपासण्यातारीख              तपासण्या             रुग्ण

२७ फेब्रुवारी         ६५३                  ३७०२८ फेब्रुवारी         २३२१                ४२३

१ मार्च                १९०३                २५३२ मार्च                २७२७                २८८

३ मार्च            ३८३२                    ४८३४ मार्च            २३१७                    ५०२

५ मार्च            ३११८                    ६०२

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्तPoliceपोलिसDeathमृत्यू