कोरोना आढावा बैठक : अजित पवारांच्या 'वक्तशीरपणा'मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ; आमदार, खासदारांचीही पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 09:28 AM2021-02-21T09:28:51+5:302021-02-21T09:31:40+5:30

Ajit Pawar in Pune Corona review meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळही उडते. रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांना आला.

Corona review meeting: Administrative officials rush due to Ajit Pawar's 'punctuality'; MLAs, MPs also fled | कोरोना आढावा बैठक : अजित पवारांच्या 'वक्तशीरपणा'मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ; आमदार, खासदारांचीही पळापळ

कोरोना आढावा बैठक : अजित पवारांच्या 'वक्तशीरपणा'मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ; आमदार, खासदारांचीही पळापळ

Next

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळही उडते. रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांना आला. (Pune Corona review meeting) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निर्धारित वेळेच्या अर्धातास आधीच पवार बैठकास्थानी येऊन बसले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पवार आल्याचे समजताच खासदार, आमदार, अधिकारी धावतपळत बैठकसाठी पोचले. (Administrative officials rush due to Ajit Pawar's 'punctuality')

शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. प्रशासकीय पातळीवरील तयारी, उपायययोजना आणि नियोजन यासाठी पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी सकाळी नऊची वेळ देण्यात आली होती. या बैठकीसाठी पवार सकाळी साडेआठच्या सुमारास विभागीय कार्यालयात पोचले. यावेळी काही मोजकेच अधिकारी पोचलेले होते. 

पवार एका कक्षात बसलेले होते. उपमुख्यमंत्री आल्याचे समजताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. दरम्यान, मंत्री दिलीप वळसे पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार ऍड. वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे,  बहिमराव तापकीर, पोलीस आयुक्त आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भरती यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी अगदी बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पोचले. त्यामुळे ते उशिरा पोचले असे म्हणता येणार नसले तरी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री वेळआधी पोचल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.

Web Title: Corona review meeting: Administrative officials rush due to Ajit Pawar's 'punctuality'; MLAs, MPs also fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.