शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कोरोना आढावा बैठक : अजित पवारांच्या 'वक्तशीरपणा'मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ; आमदार, खासदारांचीही पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 9:28 AM

Ajit Pawar in Pune Corona review meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळही उडते. रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांना आला.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळही उडते. रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांना आला. (Pune Corona review meeting) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निर्धारित वेळेच्या अर्धातास आधीच पवार बैठकास्थानी येऊन बसले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पवार आल्याचे समजताच खासदार, आमदार, अधिकारी धावतपळत बैठकसाठी पोचले. (Administrative officials rush due to Ajit Pawar's 'punctuality')शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. प्रशासकीय पातळीवरील तयारी, उपायययोजना आणि नियोजन यासाठी पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी सकाळी नऊची वेळ देण्यात आली होती. या बैठकीसाठी पवार सकाळी साडेआठच्या सुमारास विभागीय कार्यालयात पोचले. यावेळी काही मोजकेच अधिकारी पोचलेले होते. पवार एका कक्षात बसलेले होते. उपमुख्यमंत्री आल्याचे समजताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. दरम्यान, मंत्री दिलीप वळसे पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार ऍड. वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे,  बहिमराव तापकीर, पोलीस आयुक्त आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भरती यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी अगदी बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पोचले. त्यामुळे ते उशिरा पोचले असे म्हणता येणार नसले तरी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री वेळआधी पोचल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे