दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्पदंश, विंचूदंश, वीज पडून, पाण्यात बुडून, विजेचा धक्का लागून यांपैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाकडून दोन लाख रुपये मदत मिळते. याच योजनेअंतर्गत कोरोना महामारीचा समावेश करून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत करावी, जेणेकरून त्या कुटुंबाला आधार मिळेल.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा कठीण प्रसंगात वैद्यकीय उपचारांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे या योजनेद्वारे कोरोना झाल्यापासून ते कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना लाभ द्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, वासुदेव काळे यांच्या निवासस्थानी गुरुवारी (दि. ३) लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने मुंडे यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. राजकारणाच्या व्यतिरिक्त गोपीनाथ मुंडे यांचे सर्व राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींबरोबर सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी, असे वासुदेव काळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
०३ दौंड काळे
===Photopath===
030621\03pun_5_03062021_6.jpg
===Caption===
०३ दौंड काळे