पुणे: राज्य सरकारने मराठा आरक्षणावर जो काही निकाल द्यायचा आहे तो याच टप्प्यातच लावावा, सहा महिने वगैरे आता चालणार नाही. अशोक चव्हाण यांना हेच सांगायचंय की इकडंचं तिकडे करत जाऊ नका. कमिटीत तुम्ही होते तर तुम्हाला नीट विषय मांडता का येत नाही? निकाल लवकर लावा. राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही, मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा,असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार संभाजीराजे भोसले यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि एमपीएससी च्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. छत्रपती म्हणाले, कोरोना विषय संवेदनशील आहे. पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही. एसइबीसी कायदा लागला नसला तरी परीक्षा लांबवून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कमिटी बोलावून निर्णय घ्यावा. 21 मार्चला परीक्षा होणे गरजेचे आहे. मराठा समाजातल्या मुलांचंही हेच म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचा खेळ करू नका... विद्यार्थ्यांच्या खेळ करू नका, 102 चं घोडं पुढे करून चालणार नाही. 102 चा कायदा झाला तेव्हा चव्हाण का बोलले नाही. राज्यसभेत पारित झालंय, की राज्याचे अधिकार काढून घेतले जाऊ शकत नाहीत. तेव्हा आरक्षण चा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं. हे आता फक्त राज्याच्याच हातात आहे. सॉलिसिटर जनरलने आरक्षण कायदाच अवैध असल्याचं SC मध्ये सांगितले.