कोरोनाच्या संकटामुळे गेली ८ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा उघडण्यासाठी शासनाने इ. ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. सर्व शिक्षक शिक्षकेतरांची RT-PCR ही करोना चाचणी करून घेण्याचा शासन आदेश असल्याने चाचणी केल्यानंतरच शाळा उघडता येतील. त्यानुसार शिरूर तालुक्यातील २ हजार १०० शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची rt-pcr कोरोना चाचणी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली.
दररोज फक्त ५० शिक्षकांचीच चाचणी करता येत असल्याने आणि विविध शाळेतील शिक्षकांची संख्येचा विचार करून त्यांची चाचणी वेळेत पूर्ण होण्यासाठीचे नियोजन करणे कठीण झाले. म्हणून या कामासाठी शिरूर तहसील कार्यालय आणि आरोग्य विभाग यांनी मुख्याध्यापक मारुती कदम यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली. तालुका शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या कामी डॉ चेतन तुमळे(यवत), डॉ मयूर नरवडे, पर्यवेक्षक सुनीता जगदाळे आणि जिजा आहिरे यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी याबद्दल आरोग्यविभाग आणि नोडल ऑफिसर मारुती कदम यांचे अभिनंदन केले.
--
कोट
सर्व शिक्षकांच्या कोवीड चाचण्या पूर्ण झाल्याने नववी ते बारावीच्या तालुक्यातील ८६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्याचे शिरूरचे गटशिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे यांनी सांगितले.---------------------------------फोटो:तालुक्यातील शिक्षकांची कोरोणा चाचणी पूर्ण झाली