पुणे : शहरासाठी आठवड्याचा पहिलाच दिवस दिलासादायक ठरला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्याची सुरूवातही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या अधिकच्या संख्येने झाली आहे़. आज दिवसभरात ३ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात २ हजार ५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज ८ हजार ३८३ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २ हजार ४़५२ टक्के इतकी आहे़.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या २९ हजार ९१७ इतकी झाली आहे़. शहरातील विविध रूग्णालयात ५१ जणांवर व्हेंटिलेटरवर, २९ जणांवर आयसीयूमध्ये तर ३३६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़. बाधितांपैकी ४़१४ टक्के रूग्णांना रूग्णालयात उपचाराची गरज भासली आहे़.
आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़. आजपर्यंत शहरात ४३ लाख ३७ हजार ३७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़. यापैकी ६ लाख ३९ हजार ४२० जण बाधित आढळून आले असून, यातील ५ लाख २५८ कोरोनामुक्त झाले आहेत़ आत्तापर्यंत शहरात ९ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे़.