वय वर्षे ६० वरील व्यक्तींना आणि ४५ ते ६० वय असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण केला जातोय. लसीकरणास वाल्हेमध्ये चांगला प्रतिसाद पाहवयास मिळत आहे.
वाल्हे परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक लसीचा लाभ घेताना दिसत आहेत.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजपर्यंत वाल्हे, नावळी, राख, जेऊर, पिसुर्टी, आडाचीवाडी, सुकलवाडी, दौंडज, हरणी, पिंगोरी, वागदरवाडी तसेच सासवड, जेजुरी, नीरा येथील अनेक लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. तसेच वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिकेमधून लसीकरणासाठी लाभार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्याची व परत घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आजपर्यंत ६८४ लाभार्थ्यांनी लसीकरण केले असून, शुक्रवारी दिवसभरात १६४ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, डॉ. अभिष भुजबळ यांनी दिली.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील काही दिवसांत परिसरातील गावातील ज्येष्ठ, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. पुढील आठवड्यात एक हजारच्या दरम्यान व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व प्रा. संतोष नवले यांनी आरोग्य केंद्रास भेट देत लसीकरणाचा आढावा घेतला.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, डॉ.अभिष भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, औषधनिर्माण अधिकारी शकील तांबोळी, आरोग्य सहायक तानाजी मेटकरी, लॅब टेक्निशियन विजय चव्हाण, आरोग्यसेविका धनश्री राऊत, जयश्री घुले, रेखा कोळेकर, गार्डी एस. एस, तसेच आशा सेविका, अमोल जाधव, संदीप भुजबळ लसीकरणासाठी काम करत आहेत.
--
फोटो २६वाल्हे लसीकरण
फोटोओळ:- वाल्हे (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर कोरोना लसीकरणासाठी झालेली गर्दी.