उपकेंद्रात आयोजित लसीकरणा प्रसंगी सरपंच चंद्रभागा खर्डे, मंत्रालय कक्षाधिकारी अजय खर्डे, ग्रामविकास अधिकारी के. बी. घासले, ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप, सोपान पुंडे, दिपक पुंडे, शर्मिला तळोले, राजश्री रूपनेर, आशिया तांबोळी, विठ्ठल खर्डे, दादा खर्डे, भरत गायकवाड, बाळू लोखंडे, प्राचार्य अनिल शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यात सर्वत्र कोरूना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून गावातही शिरकाव होत आहे अशा प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लसीकरण करण्यावर सर्व अधिक भर दिला आहे यासाठी गावपातळीवरील उपकेंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कवठे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी नामदेव पानगे यांनी ६० वर्षावरील तसेच ४५ ते ५९ वर्षातील लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष असल्याचे सांगितले. कान्हुरमेसाई येथील उपकेंद्रात पहिल्याच दिवशी गावातील १०० लोकांना धोरणाची प्रतीत स्पर्धात्मक लस देण्यात आली यानंतर चार ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.
प्रास्ताविक कान्हूरमेसाई उपकेंद्राच्या प्राथमिक आरोग्य सेविका प्रियंका लंघे यांनी केले. अधिकारी डॉ. प्रियंका घुले यांनी आभार मानले. लसीकरणासाठी भाऊसाहेब पठारे, रसिक भोजने, आशा स्वयंसेविका आरती चव्हाण, सुजाता जाधव, सुरेखा पुंडे, प्रमिला पिंगळे, स्वप्नाली गोरडे, संगीता उबाळे, छाया मोहिते आदींनी सहकार्य केले.
--
०१कान्हूर मेसाई लसीकरण
फोटोओळ. : कान्हूरमेसाई ( ता शिरूर) येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण करताना प्रियंका लंघे समवेत कार्यकर्ते