गुळुंचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जि. प. बंधकम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी गुळूंचेचे सरपंच संभाजी कुंभार, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, उपसरपंच संतोष निगडे, गुळुंचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी निगडे, गुळुंचे सोसायटीचे व्हाईस चेअरमन एल. जी. निगडे, उत्तम निगडे, दिपक निगडे, नीरा प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य धारुरकर, डॉ. समिधा कांबळे, आरोग्य सहाय्यक बेबी तांबे, शुभांगी रोकडे, आरोग्य सेविका अनिता नेवसे, मनीषा शेंडगे, शारदा निगडे, मीना निगडे, रूपाली निगडे, सारिका पाटोळे, नंदा गायकवाड, सुवर्ण पाटोळे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गुळुंचे, कर्नलवाडी व परिसरातील वाड्यावस्त्यांवरील ज्येष्ठांना नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागत होते. पाच ते दहा किलोमीटरचा प्रवास ही करावा लागत होता. यामध्ये ज्येष्ठांचा वेळ जात होता. तरीही या दोन्ही गावातील बहुतांश ज्येष्ठांनी नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले होते. ज्येष्ठांचा हाच उत्साह पाहून गुळुंचे येथील काही संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुळूंचे उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे, अशी मागणी मागील महिन्यातच केली होती. गुळुंचेचे सरपंच संभाजी कुंभार, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे यांनी पहिल्याच दिवशी कोरोना प्रतिबंधित लस घेतल्याने सर्वसामान्य लोकांत असलेली भीती व गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. गुळुंचे उपकेंद्रात आठवड्यातील दोन दिवस लसीकरण केले जाणार आहे.