पुणे : शहरातील महापालिकेच्या ६१ केंद्रांवर आज ( गुरूवार दि. २४ जून) कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार आहेत.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्ड लसीचा ७० टक्के ऑनलाईन नोंदणीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर ३० टक्के लस या ऑनस्पॉट नोंदणी करून मिळणार आहेत.
----
२६ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
२६ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
------------------------
४५ वर्षांवरील नागरिकांना ५ ठिकाणी लस
डीआरडीओ बावधान, पोलिस हॉस्पिटल स्वारगेट, ससून हॉस्पिटल पुणे स्टेशन, रेल्वे हॉस्पिटल पुणे स्टेशन व आयआयएसईआर औंध-पाषाण येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना ८० टक्के कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस उपलब्ध राहणार आहे. तर २० टक्के लस ज्या नागरिकांनी १ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांच्याकरिता याठिकाणी राखीव ठेवण्यात आली आहे. ऑन द स्पॉट नोंदणी करून येथे लस मिळणार असून, येथे प्रत्येकी १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.
-------------------------------