कोरेगाव भीमा (पुणे): कोरोना प्रतिबंधक लस कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत 5 हजारपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विराज रमेश भांडलकर, डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले. कोरेगाव भीमा परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने गावात सणसवाडी, लोणीकंद आदी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार कोरेगाव भीमामध्ये राहतात.
काही महिने सुरुवातीला लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी भल्या पहाटे रांग लावावी लागत होती. परंतु गेले तीन दिवस मिशन कवच कुंडल योजनेअंतर्गत दररोज 800 पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत असल्याने नागरिकांना सहजपणे पहिला व दुसरा डोस उपलब्ध होत आहे. यावेळी नागरिकांना योग्य पद्धतीने लस मिळावी यासाठी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, विजय गव्हाणे, केशव फडतरे, संपत गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत असतात.
लसीकरणासाठी आशा मंगल खरात, सुनीता काकळीज, अमृता गव्हाणे, अश्विनी फडतरे, सोनाली राऊत, सिस्टर कोकिळा कराळे यांच्यासह सागर गव्हाणे, राजू गवदे, नितीन गव्हाणे, सुनील सव्वाशे, सुरेश भांडवलकर, किरण नानगुडे, तात्यासाहेब साळुंखे, बबलू शिंदे आदी मदत करत आहेत.
लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाहीकोरेगाव भीमा येथे तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ५ हजार लसीकरणाच्या टप्पा पूर्ण झाला असून यापुढील काळात औद्यिगिक कारखान्यांच्या सि एस आर फंडाच्या माध्यमातून असेच लसीकरण गावात आनण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत लसिकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही असे आश्वासन सरपंच अमोल गव्हाणे यांनी दिले.