शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

Corona Vaccination Pune: पुणेकरांनो, लसींचा पुरवठा न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र शुक्रवारी बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:54 PM

पुणेकरांनो, राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार 

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. मागील शनिवारपासून तीन दिवस पुणे शहरातील लसीकरण बंद होते. सरकारकडून लसी प्राप्त झाल्यानंतर काही प्रमाणात बुधवारी ते सुरू झाले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी(दि.२१) पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.                                         

पुणे महापालिकेला राज्य सरकारकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा झाला नव्हता. शहरातील लसीकरण केंद्र गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे.काही प्रमाणात लसी प्राप्त मिळाल्यानंतर लस देणे सूूरु झाले होते. पण पुुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. 

पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या गुरूवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आज दिवसभरात शहरात केवळ ९३१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.या आठवड्यात रूग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १५ हजार ४३ वर आली आहे. आज दिवसभरात १ हजार ७६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.      आज दिवसभरात १२ हजार २२६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही केवळ ७.६१ टक्के इतकी आढळून आली आहे. रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजाराच्या आसपास असतानाही आज यात दोन हजाराने वाढ झाली तरी, नव्या कोरोनाबाधितांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारMayorमहापौर