प्राथमिक आरोग्य केंद्र लांडेवाडी येथे लसीकरण व नवीन रुग्णवाहिका याचे उद्घाटन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्या शीतलताई तोडकर ,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, लांडेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अंकुश लांडे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनानुसार ६० वर्षांवरील सर्व नागरिक व ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरण दिले जाणार आहे. या लसीकरणाचा गावातील व शेजारील गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना चांगला फायदा होणार आहे. तसेच लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतने १४ वा वित्त आयोगांतर्गत निधीतून पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने दिलेल्या रुगणवाहिकेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तुषार पवार, डॉ. विश्वजित पाटील, डॉ. श्वेता गुंजाळ, डॉ. संतोष बलकार, डॉ. करण परदेशी व आरोग्यसेविका वाय. बी. आडवळे, जी. डी. भोर, उपसरपंच दत्ता तळपे, ग्रा. पं, सदस्य तुकाराम शेवाळे, राजेंद्र शेवाळे, सुभाष लांडे, अर्चना राजगुरू, रूपा शेवाळे, तसेच भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अशोक गव्हाणे, खंडेराव आढळराव, रामदास आढळराव, नारायण लांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी आर. आर. भुसुम यांनी मानले.