याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने उपस्थित होते. पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ३४ गावांतून ही लसीकरण मोहीम पार पडणार असून, या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्रवीण माने यांच्या हस्ते झाला.
६० वर्षांवरील सर्व व्यक्तींनी व ४५ ते ५९ ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर, दमा सारखे दुर्धर आजार असतील अशा सर्व व्यक्तींनी पळसदेव, बिजवडी ,भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे जाऊन लस घ्यावी तसेच लसीकरणासाठी सोबत येताना पॅनकार्ड किंवा आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे,सरपंच इंद्रायणी मोरे उपसरपंच पुष्पलता काळे , हनुमंत नाना बनसोडे ,भालचंद्र बापू बांडे,मेघराज कुचेकर,अंकुश जाधव, अजिनाथ पवार ,महेंद्र काळे ,स्वप्निल काळे , सुजित मोरे ,अनिल कुचेकर ,डॉ. रणजित जाधवर, सतीश मोरे ,उमेश काळे, डोंगरे गुरुजी,निलेश रंदवे , डॉ. मदने उपस्थित होते.