शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Corona vaccine : पुण्यातही मिळणार खासगी रुग्णालयांमध्ये लस; महापालिका वाढविणार 5 हजारांपर्यंत क्षमता 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 8:26 PM

केंद्र शासनाकडून ‘को-विन’ प्रणालीमध्ये सुधारणा

ठळक मुद्देशासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार

पुणे : केंद्र शासनाने 1 मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातही ही लस आता उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाने नुकतीच 60 वर्षांपुढील आणि 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. या लसीकरणाबाबतची अगदी जुजबी माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून अद्याप कोणत्याही मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.

पालिकेकडून 42 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यापुर्वीच्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. प्रत्येक केंद्रावर 100 या प्रमाणे दिवसाला पाच हजार लस मोफत देण्याचे नियोजन करण्याचे काम सुरु असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले. याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हीटीसोबतच अन्य तयारी सुरु करण्यात आली आहे.====लसीकरणासाठी तयार करण्यात आलेली  ‘को-विन’ प्रणाली अद्ययावत (व्हर्जन 2.0) करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शनिवार आणि सोमवारचे लसीकरण थांबविले आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्यांचे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. मुळातच या प्रणालीमध्ये दोष असल्याने अनेक अडचणी उद्भवत होत्या. नवीन प्रणालीमध्ये आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे काय करायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे. तब्बल 30 हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे याबाबत नेमक्या मार्गदर्शक सूचना न मिळाल्यास पुन्हा अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल