शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Corona virus : पुणे शहरात नव्याने सुरु होणार १० कोविड केअर सेंटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 5:56 PM

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १८०० च्या पार गेला आहे.

ठळक मुद्देतयारी सुरु : खाटांपासून विविध उपकरणे लावण्यास सुरुवातशहरातील नामवंत महाविद्यालयांच्या विद्यार्थी वस्तीगृहांचा त्यामध्ये समावेशआतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून संक्रमित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे. त्यादृष्टीने तयारीला सुरुवात करण्यात आली असून सध्या अस्तित्वात असलेल्या कोविड केअर सेंटर्ससोबत नव्याने आणखी दहा सेंटर्स उभारली जात आहेत. शहरातील नामवंत महाविद्यालयांच्या विद्यार्थी वस्तीगृहांचा त्यामध्ये समावेश असून याठिकाणी खाटांपासून विविध उपकरणे लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १८०० च्या पार गेला आहे. आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोनाची सौम्य लक्षणे दिसणा-यांना पालिका विलगीकरण करुन ठेवत आहे. शहरातील कसबा-विश्रामबाग, भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, येरवडा-कळस-धानोरी आणि शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. या भागातील नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संपकार्तील नागरिकांचे आवश्यकता भासल्यास विलगीकरण करण्यात येत आहे.या नागरिकांना ठेवण्याकरिता सध्या बालेवाडी येथील निकमार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे हॉस्टेल्स, पालिकेच्या शाळा आणि मंगल कार्यालये यांचा वापर केला जात आहे. भविष्यात ही जागा कमी पडण्याची शक्यता गृहीत धरुन नव्या इमारतींमध्ये विलगीकरण कक्षांची तयारी सुरु करण्यात आली आहे. ट्रिनीटी कॉलेज, मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय वारजे, एसएनडीटी महाविद्यालय, सिम्बायोसिस महाविद्यालय हॉस्टेल, गरवारे महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्ग्यूसन महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालयासह वाघोली जैन इन्सिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार आहेत.सध्या अस्तित्वात असलेल्या विलगीकरण कक्षांसह नव्याने सुरु होण्या-या कक्षांमध्ये एकूण ७ हजार १५० बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विलगीकरण आणि उपचारांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे. या सेंटर्समध्ये सध्या खोल्या स्वच्छ करणे, खाटा लावणे, अंथरुन पांघरुण, स्वच्छतागृहे, तपासणी आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था यांची कामे सुरु आहेत. बहुतांश सेंटर्समधील कामे पूर्ण झाली असून डॉक्टर्स आणि नर्सच्या नेमणूका झाल्यानंतर यातीला काही सेंटर्स आवश्यकतेनुसार सुरु होणार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल