पुणे : पुणे विभागामध्ये एकाच दिवसांत मंगळवार (दि.28) रोजी तब्बल 106 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 104 एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात नवीन एकाही रूग्णाची वाढ झाली नाही, यामुळे या जिल्ह्यात कोरोना विषाणूवर ब-यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले असे म्हणावे लागेल. यामुळे आता पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 563 वर जाऊन पोहचली आहे. तर 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. पुणे विभागात 1 हजार 563 बाधित रुग्ण असून 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 423 बाधीत रुग्ण असून , 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 हजार 670 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 15 हजार 706 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 14 हजार 162 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 563 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 57 लाख 15 हजार 360 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 17 लाख 88 हजार 617 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 274 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. पुणे विभाग एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण जिल्हा रूग्णसंख्या मृत्यु पुणे 1423 81सातारा 35 02 सोलापूर 65 05सांगली 29 01कोल्हापूर 11 00एकूण 1563 89
Corona virus : पुणे विभागातील एकाच दिवशी 106 नवीन रूग्णांची भर; एकट्या पुणे जिल्ह्यातील 104
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 7:25 PM
243 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
ठळक मुद्देपुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 563 वर