Corona virus : बारामतीत सापडला ११ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; मुंबईतून आलेल्या व्यक्तीला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:49 AM2020-05-18T10:49:20+5:302020-05-18T10:50:05+5:30
प्रशासनाने परिसर केला ' सील '
बारामती: बारामतीत तालुक्याच्या ग्रामीण भागात ४था कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे.तालुक्यातील मुर्टि येथे येथे हा रुग्ण मुंबई येथून त्याच्या घरी आला होता .त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे .ग्रामीण भागात सापडलेला हा तिसरा रुग्ण आहे. तर बारामती परीसरातील हा अकरावा रुग्ण आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ येथे आजपर्यंत एकुण दहा सापडले आहेत.त्यापैकी भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत. बारामती शहर कोरोना मुक्त झाले आहे.मात्र, पुणे,मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे .ग्रामीण भागात आता हे रुग्ण वाढण्याची भीती आहे .
अकरावा रुग्ण सापडल्याने बारामती तालुका धास्तावला आहे. आज सापडलेला रुग्ण मुर्टि येथील आहे. ती व्यक्ती मुंबई येथून आपल्या राहत्या घरी आली होती. तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मूर्टि गावची महसूली गावाची सीमाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडॉऊन दरम्यान कुठल्याहीपरिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.अकरावा रुग्ण सापडल्याने बारामतीची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल खडतर होणार आहे .बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे .अन्यथा प्रशासन आणि नागरीकांची डोकेदुखी वाढणार आहे .