शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

Corona virus : बारामतीत सापडला ११ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण;  मुंबईतून आलेल्या व्यक्तीला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:49 AM

प्रशासनाने परिसर केला ' सील '

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत काळजी घेणे आवश्यक

बारामती: बारामतीत तालुक्याच्या ग्रामीण भागात  ४था  कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे.तालुक्यातील मुर्टि येथे येथे हा रुग्ण मुंबई येथून त्याच्या घरी आला होता .त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे .ग्रामीण भागात सापडलेला हा तिसरा रुग्ण आहे. तर बारामती परीसरातील हा अकरावा रुग्ण आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ येथे आजपर्यंत एकुण दहा  सापडले आहेत.त्यापैकी  भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत. बारामती शहर कोरोना मुक्त झाले आहे.मात्र, पुणे,मुंबई येथून गावी  येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे .ग्रामीण भागात आता हे रुग्ण वाढण्याची भीती आहे .अकरावा रुग्ण सापडल्याने बारामती तालुका धास्तावला आहे. आज सापडलेला रुग्ण मुर्टि येथील आहे. ती व्यक्ती मुंबई येथून आपल्या राहत्या घरी आली होती.  तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे  मूर्टि गावची महसूली गावाची सीमाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लॉकडॉऊन दरम्यान कुठल्याहीपरिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.अकरावा रुग्ण सापडल्याने बारामतीची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल खडतर होणार आहे .बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे .अन्यथा प्रशासन आणि नागरीकांची डोकेदुखी वाढणार आहे .

 

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMumbaiमुंबईAjit Pawarअजित पवार